Monday, January 15, 2007

आज बरेच दिवसांनी मी आजारी पडले... उत्तरेतल्या कडाक्याच्या थंडीत निरनिराळ्या चवदार पदार्थांवर ताव मारत मी बहुदा माझ्या पचनशक्तिवर जरा जास्तच ताण दिला असावा... त्याचा परिणाम आज पहाटेपासुन दिसुन आला ... जुलाब आणि उलट्यांनी मी त्रस्त झाले आहे, पण मी खुश आहे... कारण मी आजारी आहे... आजारी पडण्यात पण एक वेगळाच आनंद असतो... आज मी चक्क सकाळी कधी नव्हे ते अकरा वाजता झोपुन उठले... वर्तमानपत्र, दुध, पाणी, औषध इ.इ. सगळ हातात... आज स्वयंपाक पण करावा लागला नाही... वाह वाह...

असं अधुन मधुन आजारी पडायला हवं... ( त्याचं एक कारण असही आहे की घरच्या पुरुषांना तेव्हा बाई ची किंमत कळते... एरव्ही सगळा आनंदी आनंदच असतो... घर की मुर्गी दाल बराबर ... I know समस्त भगिनी वर्गाचा मला इथे support मिळणार आहे ;-) ) असो...

तर आज सकाळपासुन मी माझं आजारपण enjoy करते आहे... ( on serious note I hope this doesnt last long... otherwise it would be exactly contrary to the enjoyment... ;-) )

Anyways... आजचा दिवस तर मी मजेत घालवणार आहे... आज मला माझ्या साठी वेळच वेळ आहे... किती दिवसांपासुन खलिल जिब्रान चं पुस्तक मला खुणावतयं... आज नक्कीच मी त्याच्याशी संवाद साधणार आहे... आणि पण बरयाच गोष्टी करायच्या आहेत... सगळ्या जरी पुर्ण नाही झाल्यात तरी काही गोष्टी तरी नक्कीच करता येतील... उरलेल्या पुढच्या आजारपणासाठी due...

मग तुम्ही काय विचार करताय.. उचला पेन आणि यादी करायला घ्या की आजारी पडल्यावर काय काय करायचयं म्हणजे आजारी पडल्यावर विचार करण्यात वेळ न घालवता तुम्हाला तुमची आवडती गोष्ट लगेच करता येईल...

एक मात्र नक्की की आजारी पडण्यात सुख असतं !!!

Enjoy you all आजारी people out there... Cheers...

3 प्रतिसाद्:

abhijit said...
This comment has been removed by a blog administrator.
Sameer said...

मी लहानपणी शाळेत न जाण्यासाठी (आणि दिवसभर गोष्टीची पुस्तक वाचत पडून राहण्यासाठी) अंगावर आजारपण अक्षरश: ओढवून घ्यायचो!

तेव्हा आई एकच वाक्य म्हणायची ...

"पडू आजारी ... मौज वाटे ही भारी ..."

तस काहीस झालेल दिसतय तुमच! :-)

Pranav said...

Mala pan kadhitari Aajari padane aavadate. mi avarjun ek gosht karto, javal ek Diary-pen gheun padto. itka asa nivan vel eravi kadhich milat nahi...mag vichar suru hotaat ani chhan kahitari suchun jaate!