Monday, October 19, 2009

ब्लॉग चा वाढदिवस

आज माझा ब्लॉग बघता बघता 3 वर्षांचा झाला. ब्लॉगर वर खाते उघडले जुलै 06 मधे पण पहिली पोस्ट टाकली 19 ऑक्टोबर 06 ला त्यामुळे तोच खरा जन्मदिवस.हा केक खास माझ्या ब्लॉग साठी...

ब्लॉग ची सुरुवात खरतर एकटेपणातुन झाली... म्हणजे नवरा होताच ( इनफॅक्ट ब्लॉग सुरु करायला नवर्‍यानेच प्रोत्साहन दिलं आणि ब्लॉगर वर खातेदेखिल त्यानेच उघडुन दिले. ) पण त्यावेळी आम्ही दोघेही शिकत होतो, आपापल्या लोकांपासुन, घरापासुन आणि गावापासुन दूर. आणि बरिचशी दोन ध्रुवावर दोघे आपण अशिच गत होती. मला सुटी तर त्याची परीक्षा आणि त्याला सुटी तर माझी परीक्षा. मग बरच काही बाही मी ब्लॉग वर लिहायची अगदी एखाद्या डायरी प्रमाणे. जे मनाला येईल ते, जे वाटेल ते आणि जसं वाटेल तसं. अगदी एव्हरीथिंग अंडर द सन. (आता मागे जाऊन बघु नका ;) त्या पोस्ट्स मी पब्लिक केलेल्या नाहीत. :-) )

ब्लॉग सुरु केल्यावर एक वर्ष अभ्यास आणि संसार सांभाळून माझ्यापरीने नियमीत पोस्ट टाकण्याचा प्रयत्न केला. पण नंतर दोघात तिसर्‍याच्या नुसत्या चाहुलीनेच अगदी दाणादाण उडवुन दिली. परत काही महिने ब्रेक घेतला परत थोड्याफार पोस्ट्स टाकल्या. पण कन्येच्या प्रत्यक्ष आगमनानंतर मात्र जवळजवळ एक वर्ष मी काहिही लिहिले नाही.

गेल्या जुनपासुन परत लिहायला घेतलं. फार काही लिहिलं नाही. उगाच आपली बाष्कळ बडबड. पण लिहिती झाली ह्याचच समाधान.

ह्या सर्व दिवसांत, वर्षांत लिहित असताना किंवा नसताना मराठीब्लॉग्स मात्र अगदी रेग्युलर बघत होते वाचत होते. परत लिहायला लागले ह्याचे सगळे श्रेय मी मराठीब्लॉग्स वरच्या सर्व ब्लॉगर्सना देते ज्यांच्यामुळे मला लिहायचा हुरुप आला. आणि त्यांच्या एनकरेजिंग कॉमेंट्स मुळे अजुनतरी तो उत्साह टिकुन आहे.

आज माझ्या लाडक्या ब्लॉग च्या वाढदिवसाचे निमित्य साधुन अजुन गोष्ट सांगायची म्हणजे लवकरच ह्या ब्लॉग ला एक भावंड आणण्याचा विचार आहे. पाककृतिंवर आधारित आपला एक ब्लॉग सुरु करावा असा बरेच दिवसांचा विचार प्रत्यक्षात आणावा म्हणतेय. ( आता तुमच्यापैकी काही जण म्हणतिल की एक ब्लॉग सांभाळुन होत नाही तिथे हा दुसरा ब्लॉग? ) पण असो प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे नाहि का? तर ह्या नव्या ब्लॉग चं नाव काही केल्या सुचत नाहिये. तुम्हाला सुचलं तर मला नक्की सांगा.

विषयांतर व्हायच्या आत ही पोस्ट इथेच संपवते. :-).

Happy B'day to you my dear blog. May you live all the days of your life. :-)


फोटो - गुगल इमेजेस वरून.

;;