Friday, June 19, 2009

बिविच्ड

मी 12 वीत असताना केबल च्या कोणत्यातरी चॅनेल वर Bewitched ही मालीका यायची.... मी कॉलेजमधुन यायची वेळ आणि ही मालीका सुरु व्हायची वेळ एकच असायची... त्यामुळे घरी आल्यानंतर चा तो अर्धा तास फारच refreshing असायचा. सारखे क्लासेस, अभ्यास, शिक्षकांच्या धमक्या, परीक्षेची दाखवलेली भिती / ताण सगळे ह्या सीरीयल मुळे विसरायला व्हायचे...

मालीकेची नायिका सॅमांथा, ऍड एजेंसी मधे काम करणारा तिचा नवरा डॅरीन आणि सासु ऎंडोरा ह्यांचे मजेशीर संवाद, डॅरीन सारखा बावळट नवरा, ऎंडोरा सारखी खट्याळ सासु आणि मालीकेचा प्राण असलेली सॅमांथा, एकदम मजा यायची ही सीरीयल बघताना.... ( काही एपिसोड्स मात्र कंटाळवाणे होते :) ... पण फारच थोडे ) आणि सॅमांथा ची ती ओठ मुडपुन जादु करायची लकब अगदिच अफलातुन... कितिदा वाटायचं की Maths शिकवणार्‍या मॅडम ला असच ओठ मुडपुन गायब तरी कराव किंवा विद्यार्थी बनवुन आपण तिला शिकवावं :D ...

ही मालीका अमेरीकेत 1964 पासुन 1972 पर्यंत 8 seasons मधे प्रसारीत झाली आणि अफाट लोकप्रिय झाली.... त्यानंतर जगातल्या अनेक भागांत त्या त्या भाषांमधे रुपांतरीत होऊन दाखविल्या गेली.. ( अधिक माहिती येथे उपलब्ध आहे... )


Brida वाचताना मला ह्या मालिकेची आठवण झाली आणि महाजालावर शोध घेण्याचे ठरवले... गम्मत म्हणजे youtube वर ह्याचे बरेचसे भाग आहेत... त्यामुळे सध्ध्या बहुतेक रोजच रात्रि सगळी कामं आटोपली की एखादा एपिसोड बघते आणि मगच झोपते..

ही आहे Season 1 च्या काही एपिसोड्स ची लिस्ट... Happy viewing ....

;;