Wednesday, January 03, 2007

काल रात्री झोपताना आई ने दिलेली गोधडी पांघरली...

एवढी मउसुत आणि हळुवार! जणु काही आईच अंगावरून अलगद हात फिरवत होती...
काय नव्हते त्या मृगजळ स्पर्षात... प्रेम, काळजी, माया आणि बरेच काही...
तिव्रतेने तिची आठवण आली पण शेकडो मैल दूर असलेली मी अर्ध्या रात्रीच्या काळोखात आठवणींचा झरा वहावण्या पलिकडे काहिच करु शकले नाही...
तिच्या प्रेमाची ऊब अनुभवत मी परत बाळ झाले होते...

माझे वाहणारे डोळे आणि पाठीवरून फिरणारा तिचा हलका कापरा हात... ह्यातच सारी रात्र सरली...

I miss you aai ...

3 प्रतिसाद्:

जयश्री said...

रोहिणी....... अगं कसलं लिहिलं आहेस गं...डॊळ्यात एकदम पाणीच आलं!

तुझा ब्लॉग फ़क्त चाळलाय..... वेळ मिळाला की वाचते..... पण अगदी आतपर्यंत पोचणारं लिहितेस गं. ग्रेट!

जयश्री

रोहिणी said...

धन्यवाद जयश्री... असे प्रतिसाद वाचले की लिहिण्याची ऊर्मी येते... माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आभार...

kedar said...

Amazing lihile aahe :-) gud one!!