Friday, December 08, 2006

संपता संपेना भय इथले अनामिक
कोळियाने विणले जाळे परि घट्ट किती ही विण

एक स्वच्छंदी पाखरू मौजेत उडे बागडे
अवचित दिसता रेशिम मोहात पडे बापडे

मऊसुत रेशिमावर पडे सूर्यकिरण अलवारं
पाखरास केले काबीज चमके सप्तरंगी ऊनं

त्या रंगीत रेशिमलडीस मोहुन पाखरू गेले
शिरताच रेशिमात त्यासी हे उलगडले

मार्ग आत शिरण्याचा असे इंद्रधनु मृगजळ
सुटकेचा मार्गच नाही केले कितीही यत्न

कोळियाने विणले जाळे पाखरू भुलुनी फसले
आकांत ऐकण्या त्याचा एकांती कोण असे?

संपता संपेना भय इथले अनामिक
कोळियाने विणले जाळे परि घट्ट किती ही विण
परि घट्ट किती ही विण!!

6 प्रतिसाद्:

Gayatri said...

वा! वेगळी..आणि छान आहे कविता.

HAREKRISHNAJI said...

Surekh kavita ani blog pan

रोहिणी said...

(गायत्री)- धन्यवाद .... माझी माय सरस्वती मुळे स्फुर्ती मिळाली... :-)

रोहिणी said...

(harekrishnaji) - Thank you... Didnt know I have readers too... Its encouraging... Thanks for visiting.

kedar said...

Good!! Nice thoughtful poem

Milind Phanse said...

कविता आवडली. मात्र 'अलवारं' व 'ऊनं' या शब्दांत अनुक्रमे र आणि न वर अनुस्वार का? अलवार तर बहुधा अव्यय आहे आणि ऊनचे बहुवचन म्हणून ऊनं केले असल्यास 'चमके सप्तरंगी ऊनं' ऐवजी 'चमकती सप्तरंगी ऊनं' हवे.