Tuesday, December 08, 2009

मन वढाय वढाय

काय करू अन काय नको असं झालंय. मन आनंदाने गिरक्या काय घेतंय, मधेच एखादी आठवण येऊन डोळे काय भरून येताहेत. काहितरी गमतीशीर आठवुन एकटीच हसतेय काय. काही विचारू नका.. का? मी जातेय माझ्या देशात. माझ्या भारतात. ओळखिच्या देशात, ओळखिच्या वातावरणात आणि ओळखिच्या भाषांत.

तेच ओळखिचे गंध, तेच ओळखिचे आवाज, तेच ओळखिचे आपुलकिचे स्पर्श सगळं पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी, अनुभवुन मनाच्या डबीत घट्ट बंद करून कधिही निसटू न देण्यासाठी.

आजीने बोटे मोडीत कडकडून काढलेली दृश्ट, बाबांचा डोक्यावरून फिरणारा हात, दादाने ओढलेले केस, आईने सुकली गं पोर माझी म्हणुन कुरवाळलेले गाल, आवडता पदार्थ केल्यावर सासुबाईंनी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप, सासर्‍यांच्या फोटोशी केलेला मुक संवाद आणि माझ्याच मनात आलटुन पालटुन चालणार्‍या डायलॉग्स वर फोटोतीलच त्यांचं टिपीकल फौजी हसणं, एकमेकींचे ( सगळ्यांत चांगले )कपडे घालण्यासाठी वहिनीशी केलेली झटापट :) आणि नंतर गळ्यांत गळे घालुन वाटुन खाल्लेला एकच पेरू. हे सगळं सगळं मला परत भेटणार आहे.

प्रत्येकासाठी भेटवस्तु घेताना त्यांच्या सोबत घालवलेले असंख्य क्षण आठवणी बनुन मनाभोवती फेर धरताहेत. मग हे नको तेच घेऊया. छे! हा रंग तिला नाही आवडायचा. ही नक्षी किती सुंदर दिसेल नाही, असे निवांत चवीचवीने शॉपींग सुरु आहे.


सासुबाईंच्या खास फर्माईशी पुर्ण करण्यासाठी पाककृतींची सारखी उजळणी सुरु आहे. आणि दादाने माझे केस ओढल्यावर त्याचे क्रु कट असलेले केस हातात कसे पकडायचे ह्याची प्रॅक्टीस नवर्‍याच्या डोक्यावर सुरु आहे :). आणि थंडीमुळे बाबांच्या भेगाळलेल्या पायांना रोज रात्री कोकम तेल लावायचं बुकिंग ही आधिच करून ठेवलंय.

आई आवाजावरून जरा ( जरा बरं का आई ! :) ) दमल्यासारखी वाटतेय. तिच्यामधे नवा उत्साह भरण्यासाठी तिच्यासोबत बाहेर भरपुर भटकणार आहे आणि मनसोक्त खादाडी करणार आहे. आताच ऑर्कुट वर एका कम्युनिटी वरून बाहेर खायचे छान छान ठिकाणं उतरवुन घेतले आहेत :). चक्क लिस्ट केली आहे. नवरा कामात बिझी आहे म्हणुन नाहितर ही लिस्ट बघुन त्याने मला माझ्या वाढणार्‍या वजनावरून चांगलेच चिडवले असते :).


आणि हो ह्या सगळ्यांतुन वेळ काढुन मी तुम्हा सर्वांचे ब्लॉग्स देखिल वाचते आहे पण तुमचे ब्लॉग वाचता वाचता मन परत काहितरी आठवणींत हरवते आणि प्रतिक्रिया द्यायचीच राहते. त्याबाद्दल मोठ्या मनाने माफ करा बरं का :).

सकाळपासुनच माझं अतिशय आवडतं गाणं सतत गुणगुणतेय. मुळ कविता आहे कृ. ब. निकुंब ह्यांची आणि हे गाणं गायलं आहे सौ. सुमन कल्याणपुर ह्यांनी.



घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात!

"सुखी आहे पोर" सांग आईच्या कानात
आई भाऊ साठी परी मन खंतावतं!

विसरली का गं भादव्यात वर्सं झालं
माहेरीच्या सुखालागं मन आचवलं!

फिरून फिरून सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो!

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगनिया करी कशी गं बेजार!

परसात पारिजातकाचा सडा पडे
कधि फुलं वेचायला नेशिल तु गडे!

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय!

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला!

हे गाणं तुम्ही ऐकु शकता इथे...

20 प्रतिसाद्:

Ajay Sonawane said...

आता सुरु होईन उलटगणती दिवसांची, एक एक दिवस जाईनासा होईन, नंतर काही तासच शिल्लक राह्तील. गूगल टॉक वर स्टेट्स मेसेज ही किती दिवस राहिलेत हे सांगेन. एक वेगळंच वातावरण असतं ते. माझ्या खुप खुप शुभेच्छा तुला !

-अजय

रोहिणी said...

@ अजय - हो ना खरंच! उलटगणती तर कधिच सुरु झाली आहे :). खुप खुप शुभेच्छांसाठी खुप खुप आभार :).

Anonymous said...

अनेक शुभेच्छा तूला आणि अगदी असेच होते सगळ्यांचे....मस्त मांडलेस.....

रोहिणी said...

@ sahajacha - हो गं तन्वी. तिकीट झाल्यापासुन मी मनाने कधिच भारतात पोचली आहे :). तुमची भारत वारी कधि?

Mugdha said...

majja aahe eka mulichI..:)

रोहिणी said...

@ Mugdha - मजा आहे खरी. मन खुप आसुसले आहे सर्वांच्या भेटीला. तुझी तिकडे एखादी चक्कर होण्याची शक्यता?

अपर्णा said...

मज्जा आहे...मी मागच्या वर्षी जाऊन आले आणि दरवर्षी जाणं होत नाही...त्यामुळे कुणी जाणार असं कळलं की माझं मन आठवणींचे हेलकावे खात राहातं...सगळं निवांतपणे होऊदे..ब्लॉग्ज काय गं आल्यावर वाच...इथे वेळच वेळ मिळतो..तिथला मात्र सत्कारणी लाव...:)

रोहिणी said...

@ अपर्णा - हो गं खरंच. कुणीही भारतात जायला निघालं की इकडे आपण आपल्याच आठवणींत हरवतो. आणि वेळ नक्किच सत्कारणी लावणार :)... पोस्ट मधे टाकल्याप्रमाणे खरोखरंच लिस्ट केली आहे खादाडीची. मी सुपर एक्साईटेड आहे :). तुलाही लवकरच भारतात जाऊन मजा करण्यासाठी खुप शुभेच्छा.

भानस said...

अग काय सांगतेस? किती मस्त.रोहिणी तू निघाली आहेस मला वाटतेय मीच जातेय.:) आता तुला दिवस कुठे जातोय ते कळणारच नाही.मनात नुसत्या लिस्टावर लिस्टा आणि वेळेच्या गणिताची जुळवणी. धम्माल करशीलच गं तरिही शुभेच्छा देतेयं.:)अगदी क्षण ना क्षण गोळा करून घे. बाकी इथले रूटीन कुठे जातेय गं... सगळे आहेतच.

Mugdha said...

सध्या माहेरंच सासरी आलंय त्यामुळे तिकडे येण्याची शक्यता नाही..पण तू मात्र मज्जा कर..खुप खुप शुभेच्छा!!

Meenal Gadre. said...

तूझी उर्मी जगण्याची तर माझ्या उर्मी माझ्या मनसागरात उठून विसावलेल्या.
तूझ्या, माझ्या लेखांवरून दिसातय की आपल्या विचारात कुठेना कुठे तरी साम्य आहेच.

रोहिणी said...

@ Bhanasa - Shree tai tumachi comment ali temvha already airport la hote. tyamule uttar dyayala jara vel hotoy. mast maja yetey. pan ata sharirane ithe tar laksha navaryakade lagala ahe ha ha ha... list madhale upakram par padnyas suruvat jhali ahe. atach garam garam idli sambar khaun ale :). parat bhetuch ya.

रोहिणी said...

@ Aparna - aga sagalya gadbadit vicharayalach visarale... tujha shifting jhala ka? settle jhalis ka navya gharat? blog vachat rahinach. parat bhetuya.

रोहिणी said...

@ Mugdha - aga kay sangates? baba ani chaku ale ahet ka? mast maja kar. babana namaskar sang majha.

रोहिणी said...

@ oormee - khup khup swagat. post vachun aavarjun pratikriya dilit. chaan vatala. asach lobh asu det.

Anonymous said...

रोहिणी, आज खूप दिवसांनी online आले आहे आणि तुझी पोस्ट सगळ्यात आधी वाचली. मस्त लिहिली आहेस. मला काही अजून सासर-माहेर असला प्रकार नाहीये. पण काही महिने घर पासून लांब काढले आहेत जॉबसाठी, so घराची ओढ काय असते हे नक्कीच माहित आहे. Hope u will enjoy ur trip.

रोहिणी said...

@ manatun - thanks Amruta :). ho ga gharachi odh ti gharachi odh. gharapasun dur rahanyacha karan kahi ka asena... kamachya vyapatun vel kadhun avarjun sagalyat adhi majha blog vachala, khup chan vatala.

भानस said...

रोहिणी तुला टॆगलेय गं मी.....पाहशील वेळ मिळाला की....:) सध्या काय बाई लय धमाल चाललीये ना...सहीच गं. Njoy.

रोहिणी said...

@ bhanasa - Thank you shree tai.. nakki baghate. dhamal mhanaje kay nusate lad chalale ahet. maja yetey.

Archee said...

A Chan... Masta Lihile aahes.... Lihit raha... Kharach aga