Thursday, July 02, 2009

Soulmate (भाग 3 )

रुची आणि त्या तरुणाची पहिली भेट होउन आता 5-6 महिने झाले होते. दोघांनीही एकमेकांना नजरेनच जोखलं होतं, ओळखलं होतं आणि स्विकारलं होतं.

त्या दिवशी रुची ला खाली पार्क मधे जायला जरा उशिरच झाला. बघते तर तो एका बेंचवर बसला होता. तिची वाट बघत असल्यासारखा. आश्चर्य म्हणजे आज पार्कमधे त्याच्याशिवाय कोणिही नव्हतं. मग तिला आठवलं की कालच शेजारच्या बाई तिला सांगत होत्या की आता मुलांची परिक्षा सुरु होणार आहे. कदाचित मुलं अभ्यास करत असतील, तीने स्वत:शिच विचार केला. आणि त्या तरुणाच्या समोरच्या बेंचवर जाउन बसली. त्याच्याकडे बघुन कळेल न कळेलसं हळुच हसली. त्याने ही हलकेच हसुन प्रतिसाद दिला.


"किती उशीर केलास भेटायला... मी किती वर्षं वाट बघतोय." तो म्हणाला. " हो ना.. उशिर झाला खरा. जाउ दे.. कसा आहेस?" भारावलेली रुची म्हणाली. " मी ठिकच आहे म्हणायचं. वेड्यासारखा तुझा शोध घेत फिरत होतो. शेवटी 6 महिन्यांपुर्वी इथे भेटलीस." आणि त्यांचे हितगुज सुरुच रहिले. दोन जीव कितीतरी वर्षांनी भेटले होते. काळवेळ ह्यांच्या सीमा ओलांडुन, जन्मांचे फेर धरत चुकवत, एकमेकांशी जडु बघत होते.

दोघांनाही एकमेकांची ओळख पटु लागली. ते द्वैत एकाकार होउ लागले. आणि एकमेकांत असलेल्या आत्मिक अद्वैताची खात्री पटली. दोघांचाही वर्तमान जन्मातील आत्मिक शोध संपला होता. अतिव आनंदाने दोघांचेही डोळे पाझरु लागले. रुची ला तो क्षण घट्ट धरुन ठेवावा असं वाटलं. काय नव्हते त्या क्षणात, मन:शांती, समाधान, आनंद, आयुष्यातले सगळे जीवनरस त्या एका क्षणात एकवटले होते. त्या एक क्षणाने त्या दोघांनाही पुर्णत्व प्राप्त करुन दिले होते. त्यांचा हा जन्म सार्थकी लागला होता.


आणि रुची ने अलगद आपले डोळे उघडले. अजुनही ती भारलेल्या अवस्थेत होती. तो तरुण तिच्यासमोरच बसला होता. दोघांची नजरानजर झाली आणि त्यांचे चेहरे उजळुन निघाले. शिव आणि शक्ती चे ही अद्वैत रुप मोहक होते. पण लगेचच त्याचा चेहरा दु:खाने झाकोळला. त्याला वर्तमानाची जाणीव झाली. त्याने प्रथमच तिच्याशी संवाद साधला आणि तिला सांगितले की त्याची दुसर्‍या देशात बदली झाली आहे आणि 2 दिवसातच तो त्याच्या कुटुंबासोबत जायला निघणार आहे. आणि हे सांगण्यासाठीच तो तिची वाट बघत होता. तिने त्याला विचारले की आता परत कधी भेटणार त्यावर तो म्हणाला आजसारखचं somewhere...sometime.... एवढं सांगुन तो जाण्यासाठी पाठमोरा वळला.


रुची हळहळली, आत्ता कुठे नात्याची जाणीव झाली होती की परत हा पाठशिवणीचा जीवघेणा खेळ सुरु झाला होता. परंतु क्षणार्धातच ती सावरली आणि तिचं मन भरुन आलं.तिचा शोध संपला होता. आज तिला तिचा Soulmate भेटला होता.

4 प्रतिसाद्:

Mugdha said...

तु paulo coelho चं ब्रीडा वाचलंयंस का? तेही काहीसं असंच आहे..म्हणजे मुळ concept असाच आहे...
छान लिहिलयस...आवडलं मला......

bhaanasa said...

चांगल लिहिलं आहेस..... भावलं.

रोहिणी said...

Mugdha - आभार... हो मी Paulo Coelho चं Brida वाचलं आहे.. आणि काही दिवसांपूर्वी त्यावर एक पोस्ट पण टाकली आहे... अगदी बरोबर. ह्या कथेतील soulmate हा concept काहिसा Brida मधिल soulmate सारखाच आहे...

Bhaanasa - धन्यवाद...

तुम्हा दोघिंना आवडलं, छान वाटलं...

Praaju said...

surekh!!!