Tuesday, June 02, 2009

मी परत आले आहे

किती दिवस झालेत लिहुन.... बरेच महिने उलटले.... पण लीहिण्याची ऊर्मी अजुनही ताजी आहे.... क़ाय नाही मिळालं मला ह्या मधल्या दिवसात... मातृत्वाचं सुख, सहचरयाचा सहवास, समृद्ध करणारे वाचन आणि अनुभव आणि बाळाने नव्याने शिकवलेली सहनशिलता... हे सारे तुमच्यासोबत share करण्यासाठी मी परत आले आहे... आणि विशेष आभार मानते marathiblogs.net वर लिहिणारया सर्व bloggers चे ज्यांच्यामुळे मला परत लिहिण्याची स्फुर्ती मिळाली....( मधल्या काळात लिहीत नसले तरी नियमीत blogs वाचत होते. )

तर आजची पोस्ट आहे माझ्या बाळावर... बाळ कसली बघता बघता 18 महिन्यांची झाली माझी सोनुली... तिच्या जन्मापासुन आजपर्यंत दिवस कसे फु्लपाखरासारखे उडुन गेले कळले सुद्धा नाही.... तिचा पहिला स्पर्श, तिचा पहिला हुंकार, तिच्या जावळाचा सुवास, सारे काही काल घडल्यासारखे वाटते...

आणि आता तर तिच्यामागे पळता पळता नुसती दमछाक होते... कधी restroom मधे स्वयंपाकघरातील भांड्यांची भातुकली मांडलेली असते तर कधी नवीन कपड्यांचा wonder wipe झालेला असतो. कधी देवघरातील देवांना नवीन देवघर मिळतं आणि चपला जोडे सोफ्यावर विराजमान झालेले असतात तर कधी उशी ची sledge झालेली असते... किती खोड्या आणि किती नाटकं आणि परत मनवण्याची हातोटी एवढी की एक बोळकंभर निर्व्याज हसु सुद्धा पुरेसं ठरावं... असं हसुन हात समोर पसरुन स्वारी गळ्यात पडुन बिलगली की राग गेलाच म्हणुन समजा!!

हे सारं काही मी भरभरुन अनुभवते आहे.... कारण मला माहिती आहे की हे दिवस फुलपाखरी असतात रंगीबेरंगी पण पापणी लवायच्या आत भुर्र्कन उडुन जाणारे... आणि त्यांना आठवणिंच्या तंतुत बांधुन ठेवण्यासाठी सुरु असलेली माझी धडपड ...

6 प्रतिसाद्:

Mahendra said...

बापरे. २००६ पासुन तुम्ही ब्लॉगिंग करता तर.. वेलकम बॅक :)

रोहिणी said...

धन्यवाद महेन्द्र... hope you like the posts...thank you for visiting...

bhaanasa said...

हो गं रोहिणी, हे दिवस अगदी भुर्रकन उडून जातील आणि कधीच परत येणार नाहीत. Unless तू पुन्हा विचार केलास .....:) अभिनंदन!

अनामिक said...

tu purvi lihaayachis tevhaa nehamich vaachaayacho. tumachyaa blogging sathi shubhechchaa.

-anaamik

अनिकेत said...

मराठी ब्लॉगर्स च्या कार्यकर्त्यांकडुन आपल्या गणेश मंडळाचे स्वागत. भरभरुन ब्लॉग येउ देत :-)

रोहिणी said...

भानस - अभिप्रायाबद्दल धन्यवाद :-) ....

अनामिक - तुमचा प्रतिसाद वाचुन आनंद झाला... मला माहिती नव्हतं की माझ्या blog ला एवढे जुने followers आहेत... good to know that. Hope you would continue reading... Thank you.

अनिकेत - प्रतिसादाबद्दल धन्यवाद...