जगण्याची ...
नेहेमीप्रमाणे संध्याकाळी रुची खाली पार्क मधे गेली. तिचे डोळे त्यालाच शोधत होते. तिकडे तोही कधिचा आला असावा. त्याचेही लक्ष तिच्या वाटेकडेच होते. दोघांच्या भिरभिरणार्या नजरेची भेट झाली आणि क्षणभर आपल्या ह्रुदयाची धडधड बंद पडते की काय असे रुची ला वाटले...
रुची दिल्लीला एका नामांकीत कंपनीत नोकरीला होती पण आधि उच्च शिक्षणाच्या ध्यासामुळे आणि नंतर नोकरीमुळे अजुन तिचे दोनाचे चार झाले नव्हते. तिकडे आई वडिलांची खटपट सुरु होतिच पण रुची कही त्यांना दाद देत नव्हती. 6 महिन्यांपुर्वीच ती कंपनीच्या दिल्ली शाखेत रुजु झाली होती. कंपनीने तिला राहायला एका पॉश सोसायटी मधे फ्लॅट दिला होता. त्याच इमारतीत एक परदेशी तरुण राहायचा. तो रोज संध्याकाळी त्याच्या बाळाला घेउन खाली पार्क मधे यायचा. रुची सुद्धा रोज खाली जायची. पार्क मधली हिरवळ, अवतिभवती सळसळणारी झाडं, खेळणारी बागडणारी मुलं बघितली की तिला कसं प्रसन्न वाटायचं.
एक दिवस शेजारणींशी पार्कमधे गप्पा मारता मारता तिने सहज बघितलं तर तो परदेशी तरुण तिच्याकडेच बघत होता. तशी रुची दिसायला बरी होती. सावळी असली तरी नाकीडोळी रेखीव होती. तिच्या वागण्याबोलण्यात एक प्रकारचा उमदेपणा होता. त्यामुळे तिचे व्यक्तिमत्व अजुनच फुलुन यायचे. कॉलेज मधे ती मुलांमधे बरीच लोकप्रिय होती पण तिने कधि कुणाला भाव दिला नव्हता. पण आज अचानक त्या तरुणाला बघुन तिला काहितरी वेगळं जाणवलं. ती सुद्धा पहिल्या नजरेतच त्या तरुणाकडे आकर्षीत झाली होती. तो तरुण होतापण तसाच कुणाही तरुणीने आकर्षीत व्हावे असा. भरपुर उंची, कसदार बाहु, कमावलेले शरीर, उन्हामुळे रापलेला तांबुस गोरापान रंग, पिंगट केस आणि शांत निळे डोळे. काय नव्हते त्या डोळ्यांत. आणि ती नजर. सारखी रुची ला त्याच्याकडे बघायला परावृत्त करत होती. राहुन राहुन काहितरी कारण काढुन रुची त्या तरुणाकडे बघत होती.
तिकडे त्याचीही अवस्था काही निराळी नव्हती. तो सुद्धा रुचीकडेच बघत होता. दोघेही एकमेकांकडे बघुन केवळ नजरेनेच भारावुन गेले होते. पण रुचीने स्वत:ला आवरले. असे आकर्षीत व्हायला आपण काय टिनेजर आहोत का आणि शिवाय तो बाळाला घेउन आला आहे. एकुण देह्बोलीवरुन ते बाळ त्याचच वाटतय. घरी त्याची बायको पण असेल. तो आपल्याला बघतोय असा आपला उगाच गैरसमज झाला असावा अशि स्वत:च स्वत:ची समजुत काढली. एकवार आजुबाजुला बघुन घेतले. पण हा नजरेचा खेळ कुणाच्याही लक्षात आला नव्हता. तिने हुश्य केले आणि घरी जायला निघाली. ती वळली पण तिला सारखे वाटत होते की तो तरुण अजुनही आपल्यालाच बघतोय. आणि तिने आपला चालण्याचा वेग वाढवला.
(क्रमश:)
8 प्रतिसाद्:
वाचतेय गं....:)
देशी मुलगा भेटला नाही वाटतं नकटीला. मराठी मुलींना मराठी सोडुन सगळे चालतात. च्यायला.
येउद्या पुढचा भाग, पहीला भाग अजुन थोडा मोठ्ठा चालला असता..
पुढचा भाग येऊ देत लवकर..!!
पुढचा भाग येऊ देत लवकर..!!
@anonymous - 1) अहो ती काही नकटी नाहिये..नाकिडोळी चांगली रेखीव आहे.
2) रुची मराठी मुलगी आहे असे मी कथेत कुठेच म्हणले नाहिये. ते केवळ एक पात्र आहे. ते पंजाबी , बंगाली, दक्षीण भारतीय कुणी पण असु शकते.
3) 'मराठी मुलींना मराठी सोडुन सगळे चालतात' हा तुमचा वैयक्तिक अनुभव असेल :-).
4) एक विनंती - हा ब्लॉग सभ्य लोक वाचतात तेव्हा कृपया निदान ह्या ब्लॉग वर तरी शिवराळ भाषा वापरु नये.
5) वेळात वेळ काढुन ब्लॉग वाचुन अभिप्राय टाकण्याची तसदी घेतल्याबद्दल धन्यवाद.
@अनिकेत - पोस्ट पब्लिश झाल्यावर मला सुद्धा वाटले की हा भाग थोडा मोठ्ठा चालला असता. पुढच्या वेळेस काळजी घेइन.
hmm chagle aahe :)
ek suchna: bhaag 3 aadhee distoy! te jaara badlanaar ka? mhnje bhaag ek mag don aani mag teen :)
Post a Comment