Thursday, June 11, 2009

स्वगत

मागचे काही दिवस अतिशय व्यस्त गेलेत. मागच्याच आठवड्यात एक event होता. त्याच्या कल्पनेच्या जन्मापासुन ते , तो event पार पडेपर्यंत प्रत्येक क्षणाला मी साक्षी आहे. बरेच चांगले वाईट अनुभव या दरम्यान आलेत... पण त्याबद्दल परत कधितरी... आधि त्या कल्पनेवर काम करणं, त्याला रंग, रूप, आकार इ. सर्व देणं, ती कल्पना प्रत्यक्षात उतरावी यासाठी अनंत खटपटी करणं ह्यात बरेच दिवस गेलेत.... आणि आज जेव्हा जरा मोकळा वेळ मिळाला तेव्हा लक्षात येतय की गेल्या काही दिवसात किती गोष्टी मी miss केल्या आहेत...

1) चांगलं वाचन करायला जमलं नाही (अगदी blogs सुद्धा )
2) लेकीसोबत मजेत वेळ घालवता आला नाही.
3) चांगला cinema बघितला नाही.
4) मस्त photography करत भटकंती केली नाही .
5) नवीन पाककृती करून बघितली नाही.
6) नवीन चित्र काढली नाहीत.
7) लांब फिरायला गेलो नाही.
8) चवीचवीने निवांत जेवले सुद्धा नाही.
9) Online radio वर classic bollywood ऐकत लोळले नाही :)
10) चॉकलेट चघळत नवर्‍याशी माझ्या वाढणार्‍या वजनावर चर्चा केली नाही :)

बाकी काही अजुन आठवत नाहिये :) ... पण बर्‍याच गोष्टी करायच्या राहुन गेल्या हे मात्र खरयं... कधितरी उगाच वेड्यासारखा विचार करत बसले की क्षणभंगुर आयुष्याची कल्पना येते आणि आपल्याला आवडणार्‍या असंख्य गोष्टी आणि छंद जोपासायच्या आधिच आपली ईतीश्री झाली तर ह्या विचाराने अंगावर शहारा येतो. क़ारण जमेल तसे जमेल तेवढे हे आयुष्य मला भरभरुन जगायचे आहे. अश्यावेळेस मी पट्कन एक चॉकलेट तोंडात टाकुन camera गळ्यात अडकवते आणि लेक आणि तिची pram घेऊन फाटकाबाहेर पडते आणि नकळत मनातल्या रेडीओवर गाणे लागते ' थोडा है थोडे की जरुरत है, जिंदगी फिर भी यहॉं खुबसुरत है...'

2 प्रतिसाद्:

भानस said...

आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनात अनेक छोटे आनंदही घेण्याचा वेळ आपल्यापाशी राहिला नाहीये. पण ही इतकी धावपळ करून आपण नक्की काय मिळवतोय ह्याची बेरीज-वजाबाकी मांडायची वेळ आलीय खरी.मनातल्या गोष्टींची तहान एक एक करत पूर्ण करायला जमेलच गं.:)

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.