जगण्याची ...
मागच्याच आठवड्यात Paulo Coelho ह्यांची Brida ही कादंबरी वाचली... आकर्षक विषय, विषयाची संयत मांडणी आणि कुठेही भडकपणा येणार नाही ह्याची घेतलेली काळजी, यांमुळे मला हे पुस्तक आवडलं...
मुळात विषय माझ्या interest चा होता... त्यामुळे मी ही कादंबरी लगेच वाचायला घेतली...
तर ही गोष्ट आहे ब्रिडा नावाच्या एक आयरीश मुलीची जी प्रत्यक्षात एक witch असते. ( witch साठी योग्य मराठी शब्द सापडला नाही... क्षमस्व ! ) अनेक जन्मांपासुन ती Tradition Of The Moon ह्या परंपरेची पायीक असते... पण ह्या गोष्टीतल्या चालु जन्मात, तिला, ती एक Witch आहे हे माहिती नसतं. पण जादु शिकण्याची तिव्र आंतरीक इच्छा आणि वेळोवेळी मिळणारे संकेत आणि तिचा मित्र , तिला Tradition of The Moon ची Witch असल्याच्या संवेदना जागृत करायला मदत करणारी तिची गुरु आणि तिचा 'Soulmate' ह्यांमुळे ती आपले ध्येय गाठण्यात यशस्वी होते.
मुळात ही एक प्रेमकथा आहे... वर मी जे सांगितले आहे ती केवळ पार्श्वभुमी आहे. आणि जास्त सांगुन मी वाचनाचा मजा किरकिरा नाही करणार. तर ज्यांना witch, witchcraft, Traition Of The Moon , Soulmate ह्यांत रस आहे त्यांनी हे पुस्तक जरुर वाचावे. ( हे पुस्तक Relatively नवे आहे त्यामुळे त्याचे free ebook आंतरजालावर उपलब्ध नाही. त्यामुळे त्याची लिंक टाकता न आल्यामुळे वाईट वाटते आहे. असो.. )
3 प्रतिसाद्:
hi Rohini
witch mhanje marathimadhe 'Chetkin'
:)
wachaayla hav he pustak.
aga haa shabda malasuddha suchala hota pan hi porgi chetkin mhanayala pharach niragas ahe ga :-)
मागे कुणीतरे सुचवलं होतं या पुस्तकाबद्दल, पण विकत घेवून वाचावं असं वाटलं नाही. मिळालं तर जरूर वाचतो.
अवांतर - मी मागच्या प्रतिसादात जाणिवपुर्वक 'तु' असं म्हणालो. बहुतेक आपण समवयस्क असू असे मला वाटले, तेव्हा तु मला तु असेच म्हणायला हरकत नाही. मी तुझा ब्लॉग बर्याच वेळा वाचलाय, त्यामुळे परत आलेली बघून नक्कीच आनंद झाला. मला मधल्या काळात अंतरजालावर वाचुन वाचुनच थोडंफार लिहायची स्फुर्ती मिळाली.
Post a Comment